ऑस्ट्रेलियात जगात सर्वप्रथम येणार फाईव्ह जी नेटवर्क

vodafon
ऑस्ट्रेलियात २०२० साली जगातील पहिले फाईव्ह जी मोबाईल नेटवर्क पोहोचणार असल्याचे व्होडाफोनने जाहीर केले आहे. या अतिवेगवान नेटवर्कमुळे केवळ मोबाईलवर चित्रपट पाहणेच नाही तर ड्रायव्हरलेस कारपासून ते इंटरनेट ऑफ थिग्ज पर्यंत अनेक कामे सहज करता येणार आहेत.

व्होडाफोन हचिग्सनचे सीई इनाकी बेरोएरा या संदर्भात माहिती देताना म्हणाले की आम्ही फाईव्ह जीची तयारी सुरू केली आहे. या महिन्यात ऑस्ट्रेलियात नवीन ग्लोबल रोमिंग प्लॅन कंपनी लाँच करत आहे. व्होडाफोनचे ५० ट्क्के ऑस्ट्रेलियन ग्राहक माय व्होडाफोन अॅपचा वापर करत आहेत असे सांगून ते म्हणाले, २०२० मध्ये फाईव्ह जी नेटवर्क सुरू होणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश असेल. २०११ साली येथे फोर जी सेवा सुरू झाली आहे आणि आज ७० टक्के युजर ही सेवा वापरत आहेत. २०१६त हाच आकडा ९० टक्कयांवर जाईल असे सांगून ते म्हणाले नेटवर्कच्या जादा स्पीडसाठी आम्हाला जादा स्पेक्ट्रमची गरज भासणार आहे.

Leave a Comment