उत्तर प्रदेशातील हे आहे अविवाहितांचे गाव!

wedding
बस्ती- आता अविवाहितांचे गाव अशी उत्तर प्रदेशातील सेमरहिया या गावाची ओळख होऊ लागली आहे. या गावातील एकाही मुलीचा अथवा मुलाचा गेल्या काही वर्षात विवाह झालेला नाही. या गावातील मुलांचे आणि मुलींचे विवाह होत नाहीत याला कारणही अत्यंत क्षुल्लक आहे. गावातील मुला-मुलींना शौचालयाचा वापर करणेच माहित नसल्याने हे घडत आहे.

पुर्वी काही शौचालये या गावात होती मात्र नागरिक त्याचा वापर करत नसल्यामुळे त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीचा प्रश्नच नव्हता. आता ही सर्व शौचालये उद्वस्त झाल्यातच जमा असून या संदर्भात जिल्हाधिकारी अनिलकुमार दमेले यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सर्वेक्षण करुन या ठिकाणी तातडीने शौचालये उभारली जातील असे आश्वासन दिले.

Leave a Comment