लेईकोने आणला १२८ जीबीचा ‘सुपरफोन’

leco
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत दोन ‘सुपरफोन’ चीनमधील स्मार्टफोन बनवणारी प्रसिद्ध कंपनी लेईकोने लॉन्च केले असून या दोन स्मार्टफोनची नावे ले मॅक्स आणि ले १ एस अशी आहेत. आयफोनपेक्षाही हे दोन्ही स्मार्टफोन महाग असणार आहेत. लेईको कंपनीच्या मतानुसार, भारतीय ग्राहक आकर्षक फीचर्स, लूक आणि क्वालिटीकडे पाहून महागडे स्मार्टफोन्सही खरेदी करतात.

१० हजार ९९९ रुपयांपासून अगदी ६९ हजार ९९९ रुपयांपर्यंत लेईको कंपनीने तयार केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती असून हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी ठेवले आहेत.

सिल्व्हर कलरमध्ये ले मॅक्स या ६४ जीबी स्टोरेज मॉडेलला लॉन्च केले असून त्याची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. यामध्ये हँडसेटचा १२८ जीबी स्टोरेज असणारा गोल्ड व्हेरिएंट मध्येही उपलब्ध आहे. गोल्ड व्हेरिएंटची किंमत सध्या जाहीर करण्यात आलेली नसली तरी १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची संख्या मर्यादित आहे. यामधील गुलाबी रंगाचा स्मार्टफोन ६९,९९९ रुपयांना मिळणार आहे.

१३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा ‘ले 1 एस’ या स्मार्टफोनला आहे. तर ले मॅक्सला २१ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ४ अल्ट्रापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चीनमध्ये गेल्याच वर्षी ले मॅक्स हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. तर ले १ एस स्मार्टफोन ऑक्टोबर २०१५ मध्ये लॉन्च झाला होता. या दोन्ही स्मार्टफोनसाठी भारतीय बाजार हा देशाबाहेरील पहिला बाजार असणार आहे.

Leave a Comment