मधुचंद्राच्या रात्रीच युवकाच्या स्वप्नांचा चुराडा, ‘ती’ निघाली ‘तो’

honeymoon
जोधपुर – लग्नाचा एक अजब प्रकार जोधपूरमध्ये घडला असून एका युवकाची सुंदर बायको मिळवण्याच्या नादात फसवणूक करण्यात आली आहे. जेव्हा त्याच्या बायकोची सत्यता समोर आली तेव्हा या युवकाच्या तोंडाचे पाणी पळाले. न्याय मिळवण्यासाठी आता हा पीडित युवक फेऱ्या मारत आहे.

डांगियावासच्या रसीदा गावात राहणाऱ्या सुनील या युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांना सांगताना तो म्हणाला की त्याच्या परिवाराशी हरचंदराम नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला व सुनीलच्या लग्नासाठी वधु सुचवली. सुनीलने सांगितले की लग्न लाऊन देण्याचा बदल्यात हरचंदरामने त्याच्या परिवाराकडून दोन लाख रुपये घेतले. निरमा नावाच्या मुलीशी सुनीलचे लग्न ठरले. १३ डिंसेबरला सुनीलचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. लग्नाच्या पहिल्या रात्री सुनील निरमाच्या जवळ आला. थोड्यावेळ गप्पा केल्यानंतर सुनीलने निरमाला प्रेम करण्यास सुरुवात केली. प्रेम करता-करता त्याला अचानक कळाले की निरमा मुलगी नसून तृतीयपंथी आहे. नातेवाईकांनी आपल्या स्तरावर चौकशी केली तेव्हा पण हीच बाब समोर आली की निरमा तृतीयपंथीय आहे.

निरमाने या घटनेनंतर झंवर पोलीस ठाण्यात सुनील व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध हुंड्यासाठी छळ, बंधक बनवणे व अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सुनीलला अटक झाली. त्याला तुरुगांची हवा खावी लागली. सुनीलच्या कुटुंबियांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment