यूनिवर्सिटी टॉपर बनली शिपायाची मुलगी; मोदींच्या हस्ते होणार सन्मान

rawat
लखनौ- बीबीएयू विद्यापीठातील एमसीएची विद्यार्थिनी असलेल्या रत्ना रावत या विद्यार्थिनीने जिद्द असेल तर आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करता हे सिध्द करुन दाखवले असून मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केलेल्या रत्ना रावतला जेव्हा आपण मिळालेले यश समजले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.

२२ जानेवारी होणाऱ्या दीक्षांत समारंभात तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात येणार आहे. रत्नाचे वडील शिपाई असून आपल्या मुलीने मिळावलेल्या यशाबद्दल त्यांना अभिमान आहे. रायबरेली रस्त्यावर कल्लीपूरव या छोटशा गावात राहणाऱ्या रत्नाच्या गावात अनेकदा वीज नसते त्यामुळे ती हा प्रश्न पंतप्रधान मोदींसमोर मांडणार आहे. अत्यंत कठीण परिस्थिती आपल्याला आपल्याला वडिलांनी शिकवले असल्याची जाणीव तिला असून आपण त्याचे नाव निश्चितच मोठे करु असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

Leave a Comment