अॅमेझॉनच्या उत्पन्नात पोस्टाच्या साहाय्याने भरघोस वाढ

amazon
नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपन्यांना भारतीय पोस्ट विभागाशी करार केल्याचा फायदा मोठय़ा प्रमाणावर होत असून ई-कॉमर्स कंपन्यांनी प्रत्येक महिन्याला एकटय़ा पोस्ट ऑफिसमधून ५० हजारापासून ६ लाखापर्यंत उत्पादनांची विक्री केली आहे. याचा सर्वात जास्त फायदा अमेरिकन कंपनी अॅमेझॉन डॉट कॉमला मिळाला आहे.

प्रत्येक महिन्यामध्ये अॅमेझॉनने सरासरी ३ लाख उत्पादनांची विक्री केली आहे. भारतीय पोस्टच्या स्पीड पोस्ट, कॅश ऑन डिलिव्हरी आणि पार्सल यांचा व्यवसाय ई-कॉमर्स कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे भारतीय पोस्टच्या नफ्यामध्ये वाढ झाली आहे.

पोस्ट विभागाच्या अहवालानुसार, पोस्ट ऑफिसची ई-कॉमर्स कंपन्यांसाठी कमाई प्रमुख झाली असून कंपन्यांचे ग्राहक लहान शहरांमध्ये वाढण्याचा मोठा फायदा कंपन्यांना झाला आहे. सर्वात जास्त ऍमेझॉनने आपल्या उत्पादनांची विक्री भारतीय पोस्टच्या माध्यमातून केली आहे. या अंतर्गत कंपनीने प्रत्येक महिन्यात ३ लाख उत्पादने विकली आहेत.

Leave a Comment