
मुंबई – ‘ऍक्वा एअर २’ हा 5 इंच डिस्प्लेचा नवीन स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इंटेक्स’ने लाँच केला असून या फोनची किंमत ४,६९० रूपये असून, हा फोन लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.
इंटेक्सने लाँच एक्वा एअर २
कसा आहे ‘इंटेक्स ऍक्वा एअर २’: ५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, अँड्रॉईड ४.४ किटकॅट ऑपरेटींग सिस्टिम, १.२ गीगा हर्ट्ज डय़ुअ कोर मीडियाटेक MT6572W प्रोसेसर , १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल, ३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी स्टोअरेज, २३०० एमएएचची बॅटरी, एलईडी फ्लॅशसह ३ मेगापिक्सर रिअर, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि यात ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ, मायक्रो यूएसबी, जीपीएस कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आले आहेत.
