अंतराळ संशोधकांचा दावा; सूर्यमालेतील नववा ग्रह सापडला

planet-nine
न्युयॉर्क – कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंतराळ संशोधकांनी आपल्या सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाच्या पुढे असलेल्या गडद अंधारात विशाल बर्फाळ ग्रह असल्याचा दावा केला असून त्यांनी याला ‘प्लॅनेट नाईन’ असे नाव दिले आहे. नवव्या ग्रहाचा दर्जा प्लुटोने आधीच गमावला असल्याने आता या नवीन ग्रहाला नवव्या ग्रहाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.

अॅस्ट्रोनॉमिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृतात्त सांगण्यात आले आहे, की हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत सुमारे ५ ते १० पटीने मोठा असून या ग्रहाचा शोध अंतराळ संशोधक मायकल ब्राऊन आणि कॉन्स्टॅंटिन बॅटगीन यांनी लावला आहे. त्यांना याचे पुरावे सापडले आहेत. परंतु, त्यांनी अद्याप हा ग्रह बघितलेला नाही.

आपल्या सूर्यमालेतील डोर्फ ग्रहांच्या आणि लहान ऑब्जेक्टच्या स्थानांचा आणि गतीचा अभ्यास करत असताना दोघांना हा ग्रह आढळून आला. गुरु किंवा शनी या ग्रहांच्या गुरुत्वीय बलामुळे हा नववा ग्रह अंधारात ढकलला गेला असावा, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, डोर्फ ग्रह आणि लहान ऑब्जेक्टच्या आपल्या सूर्याच्या भोवती परिक्रमा करण्याच्या मार्गावर हा ग्रह परिणाम करतो, असेही आढळून आले आहे.

Leave a Comment