चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी फिल्म निर्मिती क्षेत्रात

xiaomi
चीनमधील अग्रणी स्मार्टफोन कंपनी शाओमी ने फिल्म निर्मिती क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. त्यासाठी कंपनीने मिडीया ग्रुप हुओई ब्रदर्स बरोबर करार केला असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रॉडक्शन फर्म शिओमीच्या पहिल्या फिल्म इंडस्ट्री प्रोजेक्टला सपोर्ट करणार आहे.

यासाठी गु चांग्वेद व गुआन हू या सारख्या प्रसिद्ध चिनी दिग्दर्शकांसह कंपनीने स्क्रीप्ट रायटींग व टॅलेंट विकासावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. कंपनीचे सहसंस्थापक टियान यूशेंग या संदर्भात म्हणाले चीनने २०१५ मध्ये सर्व जुनी रेकॉर्डस मोडून बॉक्स ऑफिस सेल्समध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे. चीनमध्ये फिल्म इंडस्ट्रीची वाढ वेगाने होत असून गतवर्षी ४० अब्ज युआनपेक्षाही अधिक कमाई या उद्योगाने केली आहे.

Leave a Comment