बीएमडब्ल्यूची मिररलेस आय ८ ऑटो शोत सादर

bmw
जर्मन ऑटोमेकर बीएमडब्ल्यूने लास वेगास येथे सुरू असलेल्या ऑटो शो मध्ये साईड मिरर नसलेली नवी कन्सेप्ट कार आय ८ सादर केली आहे. या कारमधील इनोव्हेशन व अॅट्रॅक्टिव्ह फिचर्समुळे ही कार आत्ताच जगभरात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. अर्थात विना साईड मिरर ही संकल्पना यापूर्वीही कांही ऑटो कंपन्यांनी वापरली आहे पण बीएमडब्ल्यूचे हे इनोव्हेशन सर्वात खास असल्याचे समजते.

विना साईड मिरर कारमध्ये आरशाच्या जागी कॅमेरा बसविला जातो. त्यामुळे मागचे कांही अंशातले दृष्य चालक पाहू शकतो. बीएमडब्ल्यूच्या आय ८ मध्ये मात्र चालकाला ५० डिग्रीपर्यंतचे दृष्य पाहता येते. आरशाच्या जागी दोन व मागच्या विंडशिल्डच्या जागी बसविलेल्या एका कॅमेर्‍यामुळे हे साध्य होतेच पण तिनही कॅमेर्‍यांनी टिपलेल्या प्रतिमा एकत्र करून एकच प्रतिमा चालकाला दिसते व त्यामुळे मागच्या मोठा परिसर चालक पाहू शकतो. हे कॅमेरे सेंसर व वॉटर सेन्सिटिव्ह सर्कीटने युक्त आहेत. रियर मिररच्या जागी खास डिस्प्ले दिला गेला आहे व त्यामुळे चालक साईड मिरर न पाहताही आरामात कार चालवू शकतो.

अर्थात ही कार प्रत्यक्षात बाजारात आली तरी आशियासह कित्येक देशांच्या बाजारात ती येऊ शकणार नाही. कारण आजही अनेक देशांत साईड मिरर ऐवजी कॅमेरा बसविणे हे बेकायदा आहे.

Leave a Comment