मेक इन इंडिया कन्सेप्टची पहिली रेल्वे २२ जानेवारीला धावणार

train
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसवासियांना येत्या २२ जानेवारीला अनोखी भेट देणार असून या दिवशी मेक इन इंडिया कन्सेप्टखाली तयार झालेल्या रेल्वेच्या अत्याधुनिक कोचसह असलेली पहिली सुपरफास्ट ट्रेन मोदींनी हिरवा कंदिल दाखविल्यावर धावणार आहे. वाराणसी -नवी दिल्ली सुपरफास्ट रेल्वे धावण्याची सर्व तयारी आता पूर्ण झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या रेल्वेचे कोच अत्यंत आरामदायी व अग्नीप्रतिबंधक आहेतच पण अंतर्गत सजावटही अत्यंत आकर्षक आहे. चमकते साईनबोर्डस, डब्यात वर चढण्यासाठीचे जिने अत्यंत सोयीस्कर आहेतच पण प्रत्येक डब्यात एलईडी स्क्रीन, मोबाईल चार्जिंग पॉईंट, इको फ्रेंडली बायो टॉयलेट सुविधा, प्रशस्त व आरामदायी बर्थ आहेत. पुढचे स्टेशन कोणते याची सूचना प्रवाशांना अगोदरच मिळू शकणार आहे. १८ डब्यांची ही गाडी आठवड्यातून तीनवेळा सुटणार आहे. अर्थात या रेल्वेसाठी प्रवाशांना नेहमीच्या तिकीटापेक्षा थोडे जास्त पैसे मोजावे लागणार असले तरी विमानाच्या प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकणार आहेत.

Leave a Comment