मोदीच ट्विटरवर किंग !

modi
नवी दिल्ली : सोशल मिडियाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठ्या प्रमाणात वापर करतात. मोदी संवाद साधण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. त्यांची ट्विटरवरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत बॉलिवूड किंग शाहरूख खानला मागे टाकले आहे.

मोदी हे शाहरूखला मागे टाकत ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले दुसरे भारतीय व्यक्ती ठरले आहेत. महानायक अमिताभ बच्चन हे याबाबतील सर्वात पुढे आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ही १.८९ करोड इतकी आहे. १६ जानेवारीला मोदी यांची ट्विटर फॉलोअर्सची संख्या ही १,७३,७१,६०० इतकी झाली तर शाहरूख खानची १,७३,५१,१०० इतकी आहे. त्यामुळे मोदी हे ट्विटरवर शहरूख पेक्षाही लोकप्रिय ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यात मोदींची फॉलोअर्सची संख्या १० लाखाने वाढली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरला त्यांची फॉलोअर्सची संख्या १.५ करोड होती, तर २० नोव्हेंबरला त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६. करोड इतकी वाढली. मोदी हे २००९ पासून ट्विटरवर सक्रीय आहेत. भारतात ते सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेता आहेत. तर जगात सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले दुसरे नेता आहेत. नेत्यांमध्ये सर्वात जास्त फॉलोअर्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आहेत.

Leave a Comment