जगातील पहिली ‘महिंद्रा’ची इंटरेनट स्कुटर लाँच

mahindra
वॉशिंग्टन : जगातील पहिली जेनझेडई २.० (GenZe 2.0) ही इंटरनेट स्कुटर वाहन निर्मिती क्षेत्रातील भारताची आघाडीची कंपनी ‘महिंद्रा’ने अमेरिकन बाजारपेठेत लाँच केली असून अमेरिकन बाजारपेठेत या स्कुटरची किंमत २,९९९ डॉलर म्हणजेच १.९५लाख रूपये आहे.

सिलीकॉन व्हॅलीमध्ये जेनझेडई २.० चे कन्सेप्ट तयार करण्यात आले असून, मिशीगनच्या एन आर्बरमध्ये ही स्कुटर तयार करण्यात आली. ही स्कुटर एटीऍन्डटी नेटवर्कसह इंटरनेटशी जोडली जाते. यामध्ये एटीऍन्डटी इंटरनेट ऑफ थिंग्स मॅथेडॉलॉजीचा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे हवामान आणि ट्रफिकसारखी माहिती युजरच्या स्मार्टफोनवर सहज उपलब्ध हेते. जेनझेडई २.०चे वजन १०५ किलोग्रॅम असून, टॉप स्पीड ताशी ५० किलोमीटर आहे. या स्कुटरमध्ये सामान ठेवण्यासाठी जागा असली तरी जादा वजनाच्या सामानाची वाहतूक करणे शक्य नाही. एकदा फुलचार्ज केल्यानंतर ३.५ तास किंवा ५० किलोमीटर अंतर प्रवास करण्याची या स्कुटरची क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Leave a Comment