मार्कच्या प्रसिद्धीचा शेजाऱ्यांच्या डोक्याला ताप

mark
न्यूयॉर्क : अनेक दुरावलेली नाती मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकमुळे जोडली गेली, म्हणूनच मार्कला अनेकांच्या शुभेच्छा मिळाल्या. मात्र त्याच्या श्रीमंतीचा, प्रसिद्धीचा त्याच्या सख्ख्या शेजाऱ्यांना तापच झाला आहे.

मार्कच्या सिक्युरिटी टीममधल्या वाहनांमुळे परिसरात पार्किंगची कोंडी झाली असून झुकेरबर्ग आणि इतर शेजाऱ्यांच्या घराबाहेर असलेला सामायिक पार्किंग लॉट मार्कच्या टीमने वापरल्यामुळे शेजाऱ्यांना कटकट होत आहे.

मोक्याची पार्किंगची जागा त्याच्या दोन सिल्व्हर रंगाच्या एसयूव्हीमुळे जात असल्याचे शेजाऱ्याने इतर शेजाऱ्यांना पत्र लिहून सांगितले आहे. आम्ही शक्य तितका संयम बाळगण्याचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतुकीत अडथळा, गोंगाट, कचरा हा आता प्रमाणाबाहेर होत असल्याचा दावा शेजारी करतात. मात्र आपल्या सिक्युरिटी टीमची मार्कने बाजू घेत पार्किंग हे स्थानिक नियमांनुसार होत असल्याचे म्हटले आहे. तरीही शेजाऱ्यांना होणारा त्रास आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर असल्याचे मार्क सांगतो.

Leave a Comment