स्वस्त झाला शाओमीचा टॅब्लेट

xaiomi
नवी दिल्ली : एमआय पॅड टॅब्लेटच्या किंमतीत चीनी उत्पादक कंपनी शाओमीने मोठी कपात केली आहे. सुरुवातीला हा टॅब्लेट १२ हजार ९९९ रुपयांना मिळत होता. मात्र आता हा टॅब्लेट १० हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होत आहे. यात ७.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दोन जीबी रॅम असून १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. यात आठ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असून पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी क्षमता ६,७०० mAh ईतकी आहे.

Leave a Comment