
नवी दिल्ली : २९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केंद्रीय अर्थसंकल्प २०१६-१७ सादर करतील, अशी माहिती केंदीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. जेटली यांचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. यासाठी ४ जानेवारीपासूनच त्यांनी उद्योगजगत, कामगार संघटना आणि अर्थतज्ञ यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर विविध मंत्रालयांच्या मंत्री व विभाग सचिवांशीही चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
