सलग चार महिन्यांपासून घाऊक दरात वाढ

mahagai
नवी दिल्ली : सरकारने नुकतीच किरकोळ किमतीवर आधारित वाढलेल्या महागाईची आकडेवारी जाहीर केली होती. जाहीर करण्यात आलेल्या डिसेंबर महिन्यातील घाऊक किंमतीवर आधारित महागाईच्या आकडेवारीनुसार या महागाईतही वाढ झाली आहे. भाज्यांचे विशेषत: कांद्यांचे दर वाढल्यामुळे डिसेंबर महिन्यात या महागाईचा दर वाढून उणे ०.७३ टक्के झाला आहे. काही प्रमाणात समाधानाची बाब म्हणजे गेल्या १४ महिन्यांपासून या महागाईचा दर शून्य टक्क्याच्या खाली राहिला आहे. तर गेल्या चार महिन्यांपासून या महागाईच्या दरात वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यात या महागाईचा दर उणे ०.५० टक्के होता.

खाद्यान्नाचे दर नोव्हेंबर महिन्यात वाढले आहेत. त्यातल्या त्यात पाऊस कमी पडल्यामुळे भाज्यांचे दर वाढत आहेत. नोव्हेंबर महिन्यात खाद्यान्नाच्या महागाईचा दर ८.१७ टक्क्यांवर गेला आहे. त्या बरोबर या महिन्यात डाळी आणि कांद्याच्या दरात वाढ झाली होती. एकीकडे औद्योगिक उत्पादन कमी होत आहे तर दुसरीकडे महागाई वाढत आहे त्यामुळे भांडवल सुलभता वाढविण्यात रिझव्र्ह बँकेला अडचणी येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment