घटणार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यांवरील व्याज दर

post
नवी दिल्ली : पीपीएफ (भविष्य निर्वाह निधी), एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) आणि पोस्ट ऑफिसच्या लहान बचत खात्यांच्या योजनेवर मिळणारे व्याज दर सरकार कमी करण्याची शक्यता असून व्याज दरातील ही कपात ०.५० टक्के असू शकते. पुढील काही दिवसात सरकार नवीन व्याज दराबाबतची घोषणा करू शकते. व्याज दर कपातीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे.

याचा परिणाम बँक एफडीवर मिळणा-या व्याज दरावरही होणार आहे. सरकारच्या नव्या सूत्रामुळे लहान बचत खात्यावर मिळणा-या व्याज दराला सरकारी सिक्युरिटीजवर मिळणा-या परताव्याशी जोडण्यात येणार आहे. बचत खात्यांवर अर्धा टक्के कपात होण्याची शक्यता आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादनाच्या आधारावर व्याज दर अर्थ मंत्रालय तयार करत असून पाच वर्षे मुदतीच्या आतील खात्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. व्याज दर कपात केल्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यावर होणार नाही. सरकार आता तिमाही आधारावर लहान बचत गटावर मिळणाऱया व्याज दराचे पुनरावलोकन करणार आहे. सध्या व्याज दराचे पुनरावलोकन वर्षाच्या आधारावर केले जाते. सरकारकडून बचत खात्यावरील व्याज दर कपात करण्यात आल्यानंतर बँक एफडी (फिक्स्ड डिपॉजिट) वर मिळणा-या व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment