
नवी दिल्ली : मोटोरोलाने प्रामुख्याने पंजाबमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या लोहरी सणाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. मोटोरोलाच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर तब्बल दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट अॅपवर एक्स्चेंज आणि नव्या खरेदीवर ही ऑफर लागू होईल.
मोटोरोलाच्या अनेक स्मार्टफोनवर हजारोंची सूट
मोटो जी (थर्ड जनरेशन), मोटो जी टर्बो, मोटो एक्स प्लेवर दोन हजारांची सूट उपलब्ध आहे. मोटो जी (थर्ड जनरेशन) चे ८ जीबी मॉडेल ९ हजार ९९९ रुपयांना तर १६जीबी मॉडेल १० हजार ९९९ रुपयांना ऑफरनंतर उपलब्ध होईल. मोटो जी टर्बो १२ हजार ४९९ तर मोटो एक्स प्लेचे १६ जीबी मॉडेल १६ हजार ४९९ आणि ३२ जीबी मॉडेल १७ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
मोटोरोलाच्या सर्व स्मार्टफोनला एक्सचेंज ऑफर लागू असून मोटो ई ३जी वेरिअंटवर २ हजार, तर ४जी वेरिअंटवर ३ हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर आहे. मोटो जी (थर्ड जनरेशन) वर ४ हजार तर मोटो जी टर्बोवर ५ हजारांची एक्स्चेंज ऑफर दिली आहे. मोटो एक्स प्लेवर ७ हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर मिळू शकते, तर मोटो टर्बोवर १५ हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर मिळेल.
