वाँटेड आरोपीने पोलिसांना पाठविली सेल्फी

donald
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांना हव्या असलेल्या एका आरोपीने स्वतःची सेल्फी पोलिसांना पाठविल्याची घटना अमेरितकेतील ओहयो राज्यात घडली. या आरोपीचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेले फोटो त्याला आवडले नाहीत व त्यामुळे त्याने सेल्फी पोलिसांना पाठविली असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय डोनाल्ड ए चिप प्यू हा लिमा पोलिसांना कांही गुन्हे प्रकरणात हवा आहे. त्याचा वाँटेड या सदराखालचा फोटो सोशल मिडीयावर पोलिसांनी टाकला तो डोनाल्डला पाहायला मिळाला. लाल डोळे आणि जबरदस्तीचे हसू चेहर्‍यावर असलेला हा फोटो पाहून डोनाल्ड रागावलाच व त्याने हा मामला स्वतःच्या हातात घेण्यासाठी स्वतःचीच सेल्फी पोलिसांना पाठविली. इतकेच नव्हे तर एका मुलाखतीत पोलिसांच्या फोटोत मी कार्टूनसारखा दिसत होतो म्हणून चांगला फोटो पाठविल्याचेही त्याने सांगितले.

लिमा पोलिसांनी सोशल मिडीयावर डोनाल्डचे फोटो पाठविल्याबद्दल आभार मानलेच पण स्वतः येऊन आरोपांविषयी माहिती दिली तर अधिक बरे होईल असा संदेशही दिला. अर्थात हे फोटो व्हायरल झाले आणि डोनाल्डकडे आता सोशल मिडीया वापरणारयांचे अधिक लक्ष जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्याचा पोलिसांना डोनाल्डला अटक करण्यासाठी काय फायदा होतोय हे लवकरच कळेल.

Leave a Comment