दिल्ली ऑटो एक्स्पोत मारूतीची सात सीटर वॅगन आर

maruti
दिल्ली येथे लवकरच सुरू होत असलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये मारूती सुझुकी सात सीटर वॅगन आर प्रदर्शित करणार असल्याचे समजते. कार विक्री संदर्भात मारूती देशातील एक नंबरची कंपनी आहे. मारूतीच्या वॅगन आरने देशात चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. मारूतीची सात सीटर वॅगन आर प्रथम २०१३ साली इंडोनेशियातील इंटरनॅशनल मोटर शो मध्ये सादर केली गेली होती पण तेव्हा ते कन्सेप्ट कार म्हणून सादर केली गेली होती.

या कारला मॅन्युअल व आटोमॅटीक अशी दोन्ही ट्रान्समिशन्स ऑप्शन असतील असेही सांगितले जात आहे. गाडीची किंमत ४ ते ७ लाख रूपयांदरम्यान असेल असेही समजते. या कारला भारतीय बाजारात फोर्ड फिगो अस्पायर व ह्युंदैच्या एलिट आय २० व डॅटसनच्या गो या कारबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

1 thought on “दिल्ली ऑटो एक्स्पोत मारूतीची सात सीटर वॅगन आर”

Leave a Comment