अॅपलच्या शेअरमध्ये मोठी घसरण

apple
अॅपल इंकच्या शेअरमध्ये १०० डॉलर्सची घसरण झाली असून इतकी मोठी घसरण प्रथमच झाली असल्याचे समजते. एप्रिलपासूनच अॅपलचे शेअर घसरत आहेत ही घसरण २५ टक्के इतकी असल्याचेही सांगितले जात आहे.

शेअर घरसणीचा थेट परिणाम अॅपल उत्पादनांवर होणार असून आयफोन सिक्स एस व सिक्स एस प्लसचे उत्पादन अॅपलने घटविले असल्याचीही बातमी आहे. या फोनचा मोठा स्टॉक शिल्लक आहे मात्र आक्टोबर नोव्हेंबर मध्ये या फोन्सची अपेक्षेपेक्षा खूपच कमी विक्री झाली आहे. कंपनीने उत्पादन घटविले जात असल्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही मात्र तसे संकेत दिले जात आहेत. हे फोन असेंबल करणार्‍या तैवानी फॉक्सकॉनचा चीनमध्येही प्र्लांट आहे. दरवर्षी चीन नववर्षात ही कंपनी कामगारांना सुटी न देता ओव्हरटाईम देऊन काम करून घेत असते मात्र यंदा येथे सुट्टी दिली गेली. त्यावरूनही अॅपल फोनचे उत्पादन कमी केले गेले असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment