फेसबुकची अंध व्यक्तींसाठी नवी प्रणाली !

facebook
मेनलो पार्क : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी संगणकावरील इमेज पाहून, समजून घेऊन अंध व्यक्तींना त्यातील दृश्यांची माहिती देऊन चित्राचे वर्णन करणारी संगणकीय प्रणाली ‘फेसबुक’ विकसित करत असल्याची माहिती दिली.

आम्ही भविष्यातील तंत्रज्ञानासंदर्भात काम करत असून त्याबाबतची मोठी घोषणा २०१६ मध्ये करणार आहोत, अशी माहिती झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. व्हच्र्युअल रिएलिटीद्वारे आम्ही परस्परांना जोडण्याचा तसेच संवादाचा मार्ग बदलणार आहोत. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर व्हच्र्युअल रिएलिटीचे उत्पादने आम्ही पूर्वनोंदणीसाठी खुली करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. फेसबुक सौरऊर्जेवर चालणा-या विमानांद्वारे तसेच उपग्रहांद्वारे लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेसबुक आफ्रिकेमध्ये इंटरनेटची सुविधा पुरविणार आहे.

Leave a Comment