दिल्ली, मुंबईत मार्चपर्यंत व्होडाफोनची फोर जी सेवा

vodafone
दिल्ली- दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये येत्या मार्चपर्यंत व्होडाफोन फोर जी सेवा सुरू करणार आहे. व्होडाफोनने अगोदरच केरळमध्ये उच्च वेगाची फोर जी सेवा सुरू केली आहे. मार्च २०१६ पर्यंत ही सेवा मुंबई, कोलकता, बंगळुरू आणि दिल्ली येथेही सुरू केली जाईल, असे कंपनीने एका पत्रकात म्हटले आहे.

मुंबईत फोर जी सिमकार्डचे वाटपही देशातील दुस-या क्रमांकाची टेलिकॉम पुरवठादार असलेल्या कंपनीने सुरू केले आहे. उच्च वेगाची फोर जी सेवा सुरू होताच आमच्या ग्राहकांना मोबाईल इंटरनेट सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी ते सज्ज व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे फोर जी सिम कार्डची सुविधा देत आहोत, असेही व्होडाफोन इंडियाचे व्यावसायिक प्रमुख इशमीत सिंग यांनी सांगितले. मुंबईत लवकरच १८०० मेगाहर्टझ बँडमध्ये फोर जी सेवा सुरू करण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे, असे सिंग म्हणाले.

Leave a Comment