बॅंक कर्मचाऱ्यांचा उद्या देशव्यापी संप

bank
नवी दिल्ली- ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण आणि करिअर प्रोग्रेशन स्कीमला विरोध केल्यामुळे उद्या देशव्यापी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली असून सलग तीन दिवस बँका बंद रहाणार आहेत.

संपात तब्बल पाच लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने सरकारी बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्‍यता आहे. विलीनीकरणापूर्वी पाच सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी करिअर प्रोग्रेशन स्कीमचा स्वीकार करावा, यासाठी स्टेट बॅंकेकडून दबाव टाकला जात आहे. याविरोधात कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली आहे. बॅंक कर्मचाऱ्यांसाठी एकतर्फी सेवाशर्ती लादणे अन्यायकारक आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. नुकतीच या संदर्भात दिल्लीत श्रम आयुक्‍तांकडे बैठक झाली; मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने संप अटळ सांगण्यात येत आहे.

Leave a Comment