हा शेतकरी एका रात्रीत झाला अब्जाधीश

farmer
नवी दिल्ली : देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो असे म्हणतात तसेच काही पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झाले आहे. हा शेतकरी एका रात्रीत अब्जाधीश बनला आहे. त्यालाही ही गोष्टीचा थांगपत्ता देखील नव्हता. त्याला ही गोष्ट आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर समजली. या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण या नोटिशीत मागितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्याचे नाव घाशीराम शिवलाल असे असून त्याच्या पासबुकमधील एंट्रीमध्ये ६९२ दशअब्ज ९१ अब्ज ६ कोटी ९४ लाख ४१ हजार ६२९ इतकी रक्कम दिसत होती. ही एंट्री तीन आणि ८ तारखेला करण्यात आली आहे. दरम्यान, ही काही मोठी बाब नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तांत्रिक चुकीमुळे हे घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयकर विभागाने याबाबत माहिती मागितल्यास बँक देईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment