जगातला सर्वांत ‘चीप’ कॉम्प्युटर दाखल

chip-computer
नवी दिल्ली : नवीन कम्प्युटर घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त पर्याय उपलब्ध झाला असून अवघ्या ५९८ रुपयांना मिळणारा ‘चिप’ नावाचा कॉम्प्युटर बाजारात दाखल झाला असून या कॉम्प्युटरची अॅडव्हान्स बुकिंग अगोदरच सुरू झाली आहे. हा कॉम्प्युटर एक डेव बोर्ड असून याचे फिचर्स मात्र एखाद्या कॉम्प्युटरपेक्षा कमी नाही. कंपनीच्या मदतीने या प्रोजेक्टमध्ये जगभरातून ३९,५६० लोकांनी मिळून जवळपास १३,७० करोड रुपये जमा केले आहेत. याबद्दल कंपनीने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.

‘चीप’ कॉम्प्युटरचे फिचर्स – यात १ गीगाहर्टझ आरएआरएमचा प्रोसेसर, ५१२ एमबी डीडीएक्स रॅम, ४ जीबीचे इंटरनल स्टोअरेज ब्लूटूथ, वायफाय, ३ यूएसबी पोर्ट, मायक्रो यूएसबी पोर्ट, माइक बिल्ड इन, ऑडिओ आणि व्हिडिओ आऊटपूट पोर्ट, डेबिअन लीनू अॅन्ट ऑपरेटिंग सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. ‘चीप’ कॉम्प्युटरला वापरण्यासाठी मॉनिटरची गरज असेल. सोबतच किबोर्ड आणि माऊसपैंकी तुम्हाला एक यूएसबी तर दुसरे वाय-फाय नेटवर्कने कनेक्ट करावे लागेल. ऑडिओ आणि व्हिडिओ आऊटपूट पोर्टने तुम्ही मॉनिटरला आऊटपूट देऊ शकाल याशिवाय यामध्ये गेमही खेळता येऊ शकतो. कॉम्प्युटरसाठी किकस्टार्टर डॉट कॉमवर जाऊन ‘प्री-ऑर्डर चिप’वर क्लिक करा. यानंतर, प्री-ऑर्डर फॉर ९ डॉलरवर क्लिक करा. यामध्ये आपला ई-मेल आयडी नोंदवून आपले सबस्क्रिप्शन निश्चित करा.

Leave a Comment