सेल्फी प्रेमाची विकृती

selfiee
दोन दिवसांपूर्वी दुबईच्या एका हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला लागलेली आगीची बातमी तुम्ही वाचली असेलच पण याच घटनेशी संबंधित एक जोडपे सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचे धनी ठरत आहे.
selfiee1
दुबईतल्या एका ६३ मजल्यांच्या इमारतीने घेतलेला पेट भयंकर होता. ही आग पाहून अनेकांना भीती वाटली असेल किंवा आपल्या नातेवाईकांची काळजी वाटली असेल पण, याच वेळी एक जोडपे मात्र या जळत्या इमारतीसमोर ‘सेल्फी’ काढण्यात गुंग होते. या जोडप्याची असंवेदनशीलता आता सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरली असून नेटक-यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

Leave a Comment