‘मंगळयाना’कडून जगाला नववर्षाची अनोखी भेट

isro
नवी दिल्ली: मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळविज्ञान संस्थान ‘इस्त्रो’ने अवकाशात पाठविलेल्या ‘मंगळ याना’ने पृथ्वीवासियांसाठी नववर्षाची अनोखी भेट पाठविली आहे. ही भेट आहे मंगळाच्या पूर्णाकृती दुर्मीळ छायाचित्राची!

नववर्षाच्या स्वागताला मंगळयानाने मंगळापासून ५५ हजार किलोमीटर अंतरावरून काढलेल्या पूर्णाकृती छायाचित्रासह यानाने निरोपही पाठविला आहे; ‘पृथ्वीवासीयांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! या ठिकाणाहून मंगळाचा उत्तरध्रुव ‘कूल’ दिसत आहे.’

‘इस्त्रो’ने सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या मंगळ मोहिमेअंतर्गत मंगळयान अंतराळात सोडले आहे. या यानाने सुमारे १५ महिन्याहून अधिक काळ हे यान मंगळाच्या कक्षेत भ्रमण करीत आहे. यापुढे किमान १० वर्षापर्यंत हे यान कार्यरत राहून मंगळाचा अभ्यास करीत राहणार आहे.

Leave a Comment