इंटेक्सने लाँच केला स्वस्तातला स्मार्टफोन

intex
नवी दिल्ली : नवीन इंटेक्स क्लाउड चॅम्प हा स्मार्टफोन मोबाईल उत्पादक कंपनी इंटेक्सने लाँच केला असून हा मोबाईल फक्त कंपनीच्या वेबसाईटवर केवळ ३,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

कसा आहे क्लाउड चॅम्प – यात ४.५ इंचाचा एफडब्ल्यूवीजीए ४८०X८५४ रेझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला असून डुअर-कोर, एमटी ६५७२ एक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याची स्टोअरेज क्षमता ४ जीबी आणि ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर यात ३ जी, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता १७०० एमएएच एवढी आहे. या मोबाईल सोबत आपल्याला हेडफोन, डेटाकॉड, ट्रवल चार्जर, स्क्रीनगार्ड, प्रोटेक्ट कव्हर देखील मिळेल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment