इजिप्तमध्ये फेसबुकची फ्री बेसिक सेवा बंद

facebook1
कैरो- फेसबुकची फ्री बेसिक ही सेवा भारतामध्ये उपलब्ध व्हावी अथवा नाही यावरुन गोंधळ सुरू असतानाच फ्री बेसिकची सेवा इजिप्तमध्ये बंद झाल्याने फेसबुकला खूप मोठा धक्का बसला आहे.

इजिप्तच्या ‘इटिसालाट इजिप्त’ने फ्री बेसिक बंद होण्यामागील कारणे काय आहेत हे स्पष्ट होण्याआधीच ही सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. फेसबुकसोबत करार केलेल्या भागीदारांनी दिलेली ही सेवा आहे. फ्री बेसिक्समध्ये ज्या संस्थांनी फेसबुकसोबत करार केला आहे त्यांची सेवा विनामूल्य ग्राहकांना मिळेल असे मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले होते. भारतातील आयआयटी आणि आयआयएससी मधील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी देखील फ्री बेसिकला विरोध केला आहे.

Leave a Comment