आयबॉलचा अँडी ५.५ एच वेबर लाँच

iball
आयबॉलने त्यांच्या अँडी ५.५ एच वेबर या बजेट स्मार्टफोनचे अधिकृत लाँचिंग केले असून तो सर्व रिटेलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत आहे ६४९९ रूपये आणि तो २१ भारतीय भाषांना सपोर्ट करणारा आहे. यापूर्वी हा फोन थर्ड पार्टी ऑनलाईन रिटेलरच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केला गेला होता.

या फोनसाठी ५.५ इंची आयपीएस स्क्रीन, ड्युअल सिम, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा रियर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा तर ५ एम.पीचा सेकंडरी कॅमेरा दिला गेला आहे. फ्रंट कॅमेरा सॉफटवेअरच्या मदतीने ८ एमपीचे शॉट घेण्यासाठी सक्षम बनविला गेल्याचा कंपनीचा दावा आहे. या फोनसाठी अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस व थ्रीजी, जीपीआरएस, एज, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत. तसेच एक्सेलरेामीटर, अँबिएंट लाईट सेन्सर, मॅग्नोमीटरही त्याच्या फिचर्समध्ये आहेत.

Leave a Comment