मौल्यवान दुर्मिळ मशरूम

white
इटलीतील सेनमिनिआटोच्या टस्कन शहरात सध्या एकच धामधूम सुरू आहे आणि ती आहे व्हाईट ट्रफल मशरूमच्या स्वागताची. हे मशरूम जगातील सर्वात महागडे मशरूम मानले जाते. त्याच्या किंमती साधारणपणे किलोला अडीच ते तीन लाख रूपयांपर्यंत असतात. यंदा या किमतीत ६७ टक्के वाढ झाली असून यंदा हे मशरूम ३.३५ ते ३.५० लाख रूपयांचा दर मिळवेल असे सांगितले जात आहे.

या मशरूमच्या जगभरात ६३ जाती आहेत. मात्र त्यातही इटलीतील मशरूम दुर्मिळ आणि अधिक मौल्यवान समजले जाते. याचा वापर कोणत्याही पदार्थात केला जात नाही. येथे ट्रफल हंटिग हे परंपरेने चालत आलेले काम असून कांही कुटुंबे हे हंटिग करत असतात. ट्रफल हंटर माजिओ गुचिआरा सांगतो, आमच्या तीन पिढ्या हे काम करत आहेत. हे मशरूम शोधायचे, त्याचा स्वाद पाहायचा हे काम अवघड आहे. कारण हे मशरूम ओक, पाईन, अक्रोड आणि चिनार वृक्षांच्या मुळामध्ये ६ ते ७ इंच जमिनीखाली वाढते. त्याचे उत्पादन घेता येत नाही.त्यामुळे ते दुर्मिळ आहे. हे हंटिगचे काम कुत्र्यांच्या मदतीने केले जाते.

हे मशरूम कोणत्याही पदार्थात घातले जात नाही तर ते स्वतंत्र डिशमध्ये एखादा जडावाचा दागिना पेश करावा तसे पेश केले जाते. इटलीत दरवर्षी साधारण अशी ६०० किवंटल वजनाची मशरूम मिळतात. गतवर्षी दोन किलो वजनाचे मशरूम ४० लाख रूपयांना विकले गेले व त्याच्या सुरक्षेसाठी विमानातही गार्ड ठेवले गेले होते.

Leave a Comment