रिलायन्स जिओचा शाहरुख ब्रॅंड ऍम्बेसेडर

shahrukh-khan
नवी दिल्ली – अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान ब्रँड ऍम्बेसेडर झाला आहे. २७ डिसेंबरला आपल्या ४ जी सेवेला रिलायन्स सुरूवात करणार आहे. व्यावसायिक स्तरावर सेवांची सुरुवात कंपनी मार्च-एप्रिलपासून करणार आहे. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचा-यांसाठी येत्या रविवारपासून सेवांची अनौपचारिक सुरुवात होणार आहे.

शाहरुख खान याने मी रिलायन्सच्या जिओचा ब्रँड ऍम्बेसेडर झालो असून याबाबत मुकेश यांनी मला कल्पना दिली आहे. येत्या २७ डिसेंबरला जिओ लाँच करण्यात येईल असे म्हटले आहे.

Leave a Comment