होंडा कार्सच्या विक्रीत वाढ

honda
मुंबई – चालू आर्थिक वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात होंडा कार्सने इंडिया लिमिटेडच्या विक्रीमध्ये १४.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात होंडाने १.९० लाख वाहनांची विक्री केली आहे.

याबाबत होंडा कार्स इंडियाचे ज्ञानेश्वर सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०१५च्या दरम्यान कंपनीने १४.९ टक्केची वाढ नोंदविली असून या दरम्यान १,९०,०२४ युनिटची विक्री झाली आहे. चालू वर्षात नोव्हेंबरपर्यंत कंपनीने १,९०,०००पेक्षा अधिक वाहनांची विक्री केली. यामध्ये सिटी, अमेझ आणि जॅझ यांचे मोठे योगदान राहिले आहे. कंपनीने २०१४ मध्ये १,७९,८१६ वाहनांची विक्री केली होती. यामध्ये चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली असल्याचे माहिती देताना सांगितले.

Leave a Comment