स्वस्त ‘झेन सिनेमॅक्स २’ लाँच

zen
नवी दिल्ली : स्वस्तातला ‘झेन सिनेमॅक्स२’ हा नवीन स्मार्टफोन ‘झेन’ या स्मार्टफोन क्षेत्रातील कंपनीने लाँच केला असून ४,१९९ रूपये एवढी या फोनची किंमत आहे. ई-कॉमर्स वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

कसा आहे झेन सिनेमॅक्स २ – ५.५ इंचाचा डिस्प्ले असून ५४०x९६० पिक्सल एवढे रिझोल्यूशन आहे ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉईड लॉलीपॉप ५.१चे यात देण्यात आले आहे. तर प्रोसेसर १.३ गीगा हर्टज् क्वॉडकोर देण्यात आला आहे. यात 1 जीबीचे रॅम, ८ जीबीची इंटरनल स्टोअरेज क्षमता आणि ५ मेगापिक्सल रियर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. याची बॅटरीची क्षमता २९०० एमएएच एवढी आहे. यात थ्रीजी, ब्ल्यूटय़ूथ, वायफाय, जीपीएस, मायक्रोयूएसबी अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment