सेक्स क्षमता वाढवणाऱ्या प्रॉडक्टची या राज्यांमध्ये होते सर्वाधिक विक्री

sex
नवी दिल्ली : सेक्स क्षमता वाढवणाऱ्या प्रॉडक्टची देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरात, गोवा, बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये सर्वाधिक खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती ‘दॅट्स पर्सनल डॉट कॉम’ने केलेल्या अभ्यासान्वये समोर आली आहे.

हा अभ्यास ३० महिन्यांमध्ये आंतरिक ट्रॅफिक, ग्राहकांचे फीडबॅक, विक्रीची संख्या आणि सर्व्हेंच्या आधारावर करण्यात आला. बिहारमध्ये पुरुषांचे कामोत्तेजनावर्धक उत्पादनांची विक्री एकूण देशातील विक्रीपैकी २३ टक्के होते. तर केरळमध्ये ७६ टक्के कंडोमची विक्री होते. या विक्रीत देशातील अनेक महानगरेही पुढे आहे. या यादीत मुंबई सर्वात पुढे आहे. २टीयर आणि ३टीयर शहरांमध्येही या उत्पादनांबाबत जागरुकता वाढत आहे. २ टीयर शहरांमध्ये जयपूर, सुरत आणि लखनऊंचा समावेश आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment