एचटीसीचा ‘वन एक्स९’ लॉन्च

htc
मुंबई : ‘वन एक्स९’ हा स्मार्टफोन एचटीसी या मोबाईल कंपनीने लॉन्च केला असून हा स्मार्टफोन तूर्तास चीनमध्ये लॉन्च केलेला आहे. पण लवकरच भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती एचटीसी कंपनीकडून देण्यात आली आहे.

एचटीसीच्या वन एक्स ९मध्ये अॅल्युमिनिअम यूनीबॉडी असून हँडसेटमध्ये बूम साऊंड ड्युअल फ्रट फेसिंग स्पिकर असणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये कॅपेसिटिव्ह नेव्हिगेशन बटन देण्यात आले असून याचा डिस्प्ले ५.५ इंचाचा एचडी स्क्रीन आणि १०८०×१९२० पिक्सेल रिझॉल्युशनचा आहे. यात १६ जीबीची इनबिल्ट स्टोरेज, २ जीबी रॅम, ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो एक्स १० प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये असेल. यासोबत याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञानाने बनलेला ४ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.

एचटीसी वन एक्स९ मध्ये पॉवर बॅकअपसाठी ३००० mAh क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. नॅनो सिमची सुविधा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ३जी आणि ४जी कनेक्टिव्हिटीचीही सुविधा देण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन उत्तम म्युझिक क्वालिटीसाठी बूम साऊंड इंट्रिगेशनसोबत लॉन्च करण्यात आला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये सेन्स यूआयही पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment