या गावात आहेत चक्क १००० जुळी मुले

twins
कोची : जगभरातील प्रसार माध्यमे आणि मेडिकलचा अभ्यास करणाऱ्यांचा जमावडा केरळमधील मल्लपूरम शहरा जवळील कोडिन्ही गावात दिसून येत आहे. सर्वात जास्त जुळी मुले या गावात जन्माला येत आहेत. कोडिन्ही गावात १००० जुळी मुले आहेत.

अनेक समस्यांचा या जुळ्या मुलांना सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचा त्यांना गराडा पडत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची जणू येथे काही चढाओढ दिसून येत असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या मुलांना मुलाखत देण्यास कुटुंबीयांनी विरोध केला आहे. गावातील लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कोणत्याही माध्यमाला मुलाखत घेण्यास बंदी घालावी. तसेच ज्यांनी व्हिडिओ शुटींग केले आहे आणि मुलाखत घेतल्या आहेत, त्या परत मागवून त्यावर बंदी घालावी. तर काही ग्रामपंचायतीनी याला विरोध केला आहे. याबाबत एक बैठक घेतली. ग्रामीण भागातील मुलांचे हे एक प्रकारे शोषण आहे. ते थांबविण्यात येणे. तसेच हे शोषण थांबविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत जुळे मुलांसह प्रसिद्ध व्यक्ती आणि मुलांचे नातेवाईक यांना घेतले जाणार आहे. याबाबत १५ जानेवारीला बैठक बोलावली आहे.

Leave a Comment