वोडाफोनचे माय वोडाफोन अॅप लाँच

vodafone
नवी दिल्ली : माय वोडाफोन हे नवे अॅप वोडाफोन इंडियाने लाँच केले असून वोडाफोनचे प्रीपेड अथवा पोस्टपेड ग्राहक विना इंटरनेट या अॅपचा वापर करु शकतात.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक या अॅपच्या सहाय्याने फोनचा वापर, विविध प्लानची माहिती, बिल पेड करणे याबाबत माहिती मिळवू शकतात. तसेच रिचार्ज अथवा बोनस कार्डही खरेदी करु शकतात. त्याचप्रमाणे वोडाफोनच्या बेस्ट ऑफरचाही फायदा घेऊ शकतात. तसेच एम-पैसा खात्याचा वापरही करु शकता. तुमचा मित्र परिवार यांच्या बिलाची रक्कमही चुकती करु शकता.

वोडाफोन ग्राहकांना या अॅपद्वारे अनेक ऑफरची माहिती मिळू शकते. नव्या सेवा, अधिक माहिती मिळवण्यासाठी हे अॅप फायदेशीर आहे, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच हे अॅप बनवण्यात आल्याचे वोडाफोन इंडियाचे प्रमुख-रिटेल तसेच डिजिटलच्या कवित नायर यांनी सांगितले. गुगल प्ले स्टोरमधून तुम्ही हे अॅप विनाशुल्क डाऊनलोड करु शकता.

Leave a Comment