
मुंबई : आपल्या ब्लॅक सीरिजमध्ये ग्राहकांना मोबाईल निर्माता कंपनी झोलोने खुशखबर दिली असून तब्बल ३ जीबी रॅमवाला झोलोने आपला नवा स्मार्टफोन सादर केला आहे. ‘ब्लॅक ३ जीबी’ या फोनच्या रॅममुळे साहजिकच यामुळे ग्राहकांना डाटा ट्रान्सफरसाठी दुप्पट स्पीड मिळेल.
‘झोलो’ने आणला ३ जीबी रॅमवाला नवा स्मार्टफोन!
याबाबत कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्म ‘स्नॅपडील’वर झोलोचा ब्लॅक ३ जीबी उपलब्ध होईल. आजपासून या फोनची बुकिंग सुरू झाली आहे आणि ही बुकिंग २९ डिसेंबरपर्यंत सुरु आहे. ६४ बिट १.५ गिगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ ऑक्टकोर प्रोसेसर असणाऱ्या फोनमध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ५.५ इंचाच्या एचडी ओजीएस आयपीएस डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये दोन सीम स्लॉट आहेत यापैंकी एक स्लॉट सिम किंवा एसडी कार्डप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा ड्युएल रिअर कॅमेरा यात देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे.
