रेल्वेप्रवास उद्यापासून महागणार

train
नवी दिल्ली- उद्यापासून (२५ डिसेंबर) तत्काळ तिकिटाच्या दरात रेल्वे प्रशासनाने २५ टक्के वाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणार आहे. तत्काळ तिकिटासाठी आता २०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी स्लीपर क्लासच्या तत्काळ तिकिटावर प्रवाशांना १७५ रुपये मोजावे लागत होते. सेकंड एसी क्लासच्या तत्काळ तिकिटासाठी ४०० ऐवजी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या रेव्हन्यू क्लेकशनवर रेल्वे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामी तत्काळ तिकिटाच्या दरात वाढ करण्‍यात आली आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ तिकिटाच्या दरात प्रवासाच्या अंतरानुसार वाढ केली जाते. सेकंड क्लास सिटिंगच्या तत्काळ तिकिट दरात कोणताही बदल करण्‍यात आलेला नाही. एसी चेअर कार, थर्ड एसी, सेकंड एसी व एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील तत्काळ तिकिटाच्या दरात २० ते १०० रुपयांची वाढ केली आहे.

Leave a Comment