२०१६मध्ये आणखी स्वस्त होणार सोने !

gold
नवी दिल्ली : लवकरच सोन्यावरचे आयात शुल्क कमी होण्याची शक्यता असल्यामुळे आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होऊ शकते.
सोन्याच्या आयात शुल्कात यंदाच्या अर्थसंकल्पात किंवा त्यापूर्वीच ८ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता असून सोन्यावर सध्या १० टक्के आयात शुल्क आकारले जाते.

याबाबत वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या आयातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१.५१ टक्के तर नोव्हेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६.४८ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर सोने स्वस्त झाल्यामुळे तस्करी सारखे प्रकारही कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचे आयात शुल्क २०१३ या वर्षात वाढल्यानंतर सोन्याच्या तस्करीमध्येही वाढ झाल्याचे निरीक्षण निर्यातकांनी नोंदवले आहे.

Leave a Comment