शाओमीचा देखील ख्रिसमस धमाका !

mi-4
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने मोटोरोला पाठोपाठ ख्रिसमसच्या मुहूर्तावर तीन दिवसांच्या ख्रिसमस सेलची घोषणा केली असून हा सेल देखील २१ ते २३ डिसेंबरपर्यंत असणार आहे. याची माहिती शाओमीने ट्विटरवरुन दिली असून जवळजवळ ३००० पर्यंत सूट देण्यात आली आहे.

कंपनीच्या Mi 4 १६ जीबी वेरिएंटची किंमत १४९९९ रुपये होती यावर दोन हजारांची सूट देण्यात आल्यामुळे याची किंमत आता १२९९९ रु. असणार आहे. तर Mi 4i च्या १६ जीबी वेरिएंटची किंमत ११९९९ असून या ऑफरनुसार आता हा स्मार्टफोन ९९९९ उपलब्ध झाला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने आपल्या Mi padवर तब्बल तीन हजारांची सूट दिल्यामुळे आता हा पॅड ९९९९ रुपयात मिळणार आहे. ही ऑफर फ्लिपकार्टच्याच अॅपवर सुरु आहे. या डिस्काउंटशिवाय फ्लिपकार्ट स्टॅण्डर्ड चार्टर्ड आणि सिटी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्टावर १० टक्के कॅश बॅक ऑफर आहे. तसेच यावर सुलभ ह्फ्त्याची सुविधाही आहे.

६००० रुपयेपर्यंत फ्लिपकार्ट Mi 4 वर एक्सचेंज ऑफर असून एक्सचेंज ऑफर Mi 4iच्या १६जीबी वेरिएंटवर देखील आहे. एक्सचेंज ऑफर ही काही मर्यादित हॅण्डसेटवरच आहे. तसेच एक्सचेंज ऑफरवर मिळणारे डिस्काउंट आपल्या स्मार्टफोनवर अवलंबून आहे.

Leave a Comment