फ्लिपकार्टच्या ख्रिसमस सेलमध्ये मोटोच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट

moto
नवी दिल्ली: अनेक मोबाईल कंपन्या या ख्रिसमस जसजसा जवळजवळ येत आहे तसतसे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर घेऊन येत आहेत. आपल्या सर्व फ्लॅगशिपवर आता मोटोरोलाने अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

मोटो ई सेकेंड जनरेशनपासून नुकताच लाँच झालेल्या मोटो जी टर्बोवर या ऑफर सुरु औष्ण या ऑफर फ्लिपकार्ट बिग सेल अॅपवर आपल्या पाहता येतील. २१ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे.

आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत मोटोरोलाने बरीच कपात केल्यामुळे मोटो ई सेकेंड जनरेशन स्मार्टफोनमध्ये १००० रुपयांची घट करण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला ४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. तर मोटो जी थर्ड जनरेशनच्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. हा फोन आता १०,४९९ रुपयात उपलब्ध आहे. याची किंमत आधी ११,९९९ रुपये होती. मोटो एक्स प्ले स्टाइलच्या १६ जीबी वेरिएंटची किंमत १६,९९९ करण्यात आली आहे. ज्याची किंमत पूर्वी १८,४९९ इतकी होती. तर ३२ जीबी वेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये करण्यात आली आहे. मोटो एक्स स्टाइलच्या १६ जीबी स्मार्टफोनच्या किंमतीतही मोठी सूट देण्यात आली आहे. १९,९९९ किमंतीचा हा स्मार्टफोन आता १७,९९९ रुपयात मिळणार आहे. नुकताच लाँच झालेला मोटो टर्बोच्या किंमतीत कोणतीही घट करण्यात आलेली नाही. मात्र, या फोनवर एक्सचेंज ऑफर देण्यात आली असून ७००० पर्यंत सूट मिळू शकते.

Leave a Comment