आणखी स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल!

petrol
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नव्या वर्षात आणखी स्वस्त होण्याची शक्यता असून कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात दर वर्षातल्या नीचांकी पातळीवर पोहचले आहेत. काल कच्चा तेलाचा बाजारात ३६ डॉलर आणि ९ सेंट्सचा प्रति बॅरलवर येऊन पोहचला आहे. कच्च्या तेलाने २००४ नंतर प्रथमच ही पातळी गाठली आहे.

दरम्यान, अल-निनोचा प्रभाव या घसरणीमागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा दरवर्षी पेक्षा थंडीचा कडाका अमेरिकेत कमी असल्यामुळे याकाळात वाढणारी तेलाची मागणी यावर्षी वाढलेली नाही. तिकडे आखाती देश आणि अमेरिकेतील तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कुठलीही कपात न केल्यामुळे पुरवठ्याचे प्रमाण मागणी पेक्षा वाढले आहे. येत्या वर्षातही तेलच्या मागणी आणि पुरवठ्याचे गुणोत्तर असेच व्यस्त राहण्याची चिन्ह असल्यामुळे यापुढेही कच्च्या तेलाचे भाव खालीच राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी घसरतील असे चित्र आहे.

Leave a Comment