व्हिडीओकॉनचा झेड ५५ क्रिप्टॉन फोरजी स्मार्टफोन भारतात

vidiocon
व्हिडीओकॉनने त्यांचा पहिला फोरजी स्मार्टफोन झेड ५५ क्रिप्टॉन भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे ७९९९ रूपये. हा ड्युअल सिम फोन अँड्राईड ५.१ लॉलीपॉप ओएसवर काम करतो.

या फोनसाठी ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसहचा रियर तर ८ एम.पीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी बरोबरच वायफाय, मायक्रो यूएसबी, जीपीआरएस, ब्ल्यूटूथ अशी ऑप्शन्सही आहेत. तसेच व्हीसेफ अॅपही दिले गेले आहे. कंपनीने ९० दिवसांसाठी व्ही सिक्युअर अँटीव्हायरस अॅपही फोनखरेदीसोबत देऊ केले आहे.

Leave a Comment