फेडरलच्या दरवाढीचा बाजारांवर परिणाम

fedral
वॉशिंग्टन : अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित व्याजदरवाढीचा निर्णय अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने गुरुवारी रात्री जाहीर केल्यामुळे जगभरातील शेअर बाजार, परकीय चलन विनिमय बाजार आणि कमोडिटी बाजारांमध्ये पडसाद उमटले.

हा निर्णय फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी जाहीर केला. मात्र, आता व्याजदरांत वाढ केल्याने गेल्या काही काळात रोजगार वाढल्याच्या, उत्पन्नात वाढ झाल्याच्या आणि अमेरिकी नागरिकांपुढील आर्थिक समस्या कमी झाल्याच्या वस्तुस्थितीवरही शिक्कामोर्तब झाल्याचे जेनेट यांनी नमूद केले. रोजगारांमध्ये वाढ होण्यास आणि महागाई कमी होण्यास अजूनही वाव आहे. मात्र, अर्थव्यवस्था सुधारल्याने व्याजदरवाढीला सुरवात करण्याची ही वेळ योग्य असल्याचे आम्हाला वाटले, असे येलेन म्हणाल्या. यापुढील काळात व्याजदर हळूहळू मूळ स्थितीत आणले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार हे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment