किडनी गांव- होकसे

nepal
नेपाळमधील होकसे या गावाची ओळख किडनी गांव अशीही झाली आहे. या मागचे कारण म्हणजे या गावातील निम्मी लोकसंख्या एकाच किडनीवर जगत आहे. हा कांही वंशपरंपरागत रोग असावा असे जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. येथे एकच किडनीवर जन्मणारे कोणीही नाही तर गरीबी हे त्यामागचे मुख्य कारण आहे. येथील लोक कांही तातडीची आर्थिक सोय करण्याची वेळ आली तर किडनी विकून तो पैसा उभा करतात असे समजते.

किडनी विक्री येथे सर्रास केली जाते आणि पैशांसाठीच हा व्यवहार होतो. जन्माला पुजलेली गरीबी थोड्याफार प्रमाणात दूर करण्यासाठी, कर्जफेडीसाठी, शिक्षणासाठी अगदी घरदुरूस्ती, शेतखरेदी अशा कारणांसाठीही किडनी विक्रीचा पर्याय सर्रास स्वीकारला जातो. येथील अनेक तरूणांनी १८ ते २० वयाच्या दरम्यानच अशी किडनी विकली आहे आणि तरूण मुलांप्रमाणेच महिलाही त्यात मागे नाहीत. एकाच किडनीवर जगत असलेले हे लोक सांगतात, हे फार अवघड काम नाही. छोटे ऑपरेशन करून घ्यावे लागते पण दोन तीन दिवसांत त्याची आठवणही रहात नाही शिवाय आर्थिक गरज भागविली जाते ते वेगळेच. आता बोला!

Leave a Comment