रिलायन्स कर्मचाऱ्यांना जियोच्या लाँचिंगसाठी अंबानींचे खास निमंत्रण

reliance
मुंबई- आपल्या स्टाफला जिओच्या लाँचिंगच्या निमित्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी खास निमंत्रण दिले आहे. एका कार्यक्रमाचे २७ तारखेला त्यांनी आयोजन केले आहे त्यासाठी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण दिले आहे.

रिलायन्सची जिओ सेवा २८ तारखेला सुरू करण्यात येणार आहे. त्यादिवशी धीरुबाई अंबानी यांची जयंती आहे. २७ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमास ए. आर. रहमान आणि शाहरुख खान हे दोघे येणार आहेत.

Leave a Comment